4) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- दोन्ही बाजूच्या सैन्याचे आणि योध्यांचे वर्णन आणि शंख-ध्वनि वर्णन व त्याचा परिणाम
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी
4) दोन्ही बाजूच्या सैन्याचे आणि योध्यांचे वर्णन आणि शंख-ध्वनि वर्णन व त्याचा परिणाम
दोन्ही बाजूच्या सैन्याचे आणि योध्यांचे वर्णन
संजय उवाच:-
दृष्टवा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥१-२।।
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥१-३॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥१-४॥
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङवः ॥१-५॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥१-६॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम।
नायका मम सैन्यस्य सञ्ज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥१-७॥
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥१-८॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥१-९॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥१-१०॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥१-११॥
अध्याय १, श्लोक २ ते ११ मध्ये संजय द्वारा प्रसंग वर्णन करत या युद्धभूमीवर जमलेल्या योध्यांचे वर्णन केले आहे.
त्यानुसार आता आपण या युद्धभूमीवर युद्धासाठी समोर आलेले योद्धे सहजपणे समजून घेऊ शकु. आणि तोही मनोयुद्धभूमी आणि विकारांचा विचार करून मांडण्याचा येथे प्रयत्न आहे.
। दृष्टवा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।
पांडव आणि दुर्योधन हे प्रमुख योद्धे आहेत आणि जेव्हा मनोयुद्धभूमी चा विचार होतो तेव्हा पांडवांचे म्हणजेच धर्माचे नेतृत्व हे संयम रुपी युधिष्ठिर, सोबतच धर्माच्या अफाट शक्तीचे प्रतीक असलेला भीम, एकाग्रचित्त करण्यात महारथ प्राप्त केलेला अर्जुन, ज्ञानी नकुल आणि युधिष्ठिराप्रती (धर्माप्रती) समर्पित सहदेव, दृढनिशच्याने व्यूह रचना करणारा दृष्टदुमन्य आणि सर्वज्ञानी मार्गदर्शक स्वतः भगवान कृष्ण असा दिसून येतो.
विरुद्ध बाजूला मोहरुपी अंधारातून (धृतराष्ट्राच्या पुत्रमोहातून) उत्पन्न झालेला अहंकार रुपी दुर्योधन ज्याच्यासोबात मी सर्व काही करू शकतो या भ्रमात मोठा झालेला पुर्वाश्रमीचा देवव्रत आजचा भ्रम रुपी भीष्म, धर्म बाजूला सारून सेवक धर्मासाठी मालकाची सेवा करणारा दीन द्रोण, वाईट संगतीच्या काळोखात निष्तेज झालेला कर्ण, कपटरुपी शकुनी. अश्या शेकडो विकाराचा संचय कौरव सेनेत दिसून येतो.
एका बाजूला चांगले गुण, चांगले संस्कार, चांगल्या सवयी आणि दुसऱ्या बाजूला सहज मोहात पाडणारे अनेकानेक विकार. अश्या दोन मनोवृत्तीचा हा खरा संघर्ष आहे.
शंख-ध्वनि वर्णन व त्याचा परिणाम
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः।
सिंहनादं विनद्योच्चैः शंख दध्मो प्रतापवान्॥ ।१-१२।
ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्॥ |१-१३|
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ |१-१४|
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः।
पौण्ड्रं दध्मौ महाशंख भीमकर्मा वृकोदरः ॥ |१-१५|
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥|१-१६|
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥|१-१७|
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक्पृथक्॥|१-१८|
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्न।
भश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्॥|१-१९|
अध्याय १ मधील श्लोक १२ ते १९ मध्ये विविध योध्यांच्या शंख ध्वनीचा उल्लेख दिसून येतो.
या प्रसंगात दोन्ही बाजूंच्या पराक्रमी योध्यांनी शंखनाद केला तसेच ढोल नगारे वाजवले आणि याचा परिणाम हा दिसून येतो. असं म्हणतात कि मनुष्य जगाला फसवू शकतो पण अंतर्मनातील आवाजाला नाही. त्याचप्रमाणे अधिक योध्ये व बल असून सुद्धा शंखनादाने कौरव सेनेच्या योध्यांचे हृद्य विदीर्ण झाले असा स्पष्ट उल्लेख वरील श्लोकाच्या शेवटी दिसून येतो. म्हणजेच हे नक्की कि विकारांची असो का व्यक्तींची, नकारात्मता कितीही मोठी असू देत, जेव्हा सत्य व सकारात्मकता समोर येते तेव्हा त्यांचे स्वतःचे मन सुद्धा त्यांना साथ देत नाही. मनात शंकेचे ढग दाटू लागतात आणि मन तथा हृदय विदीर्ण होते.
या भागात एक महत्वाची बाब म्हणजे भगवान कृष्णाला येथे ऋषीकेश असे म्हंटले आहे म्हणजे इंद्रियांचा स्वामी, आणि अर्जुनास गुडाकेशन निद्रेवर (अज्ञानरुपी अंधारावर) विजय मिळवलेला असे संबोधित केले आहे आणि नातेसंबंधात किंवा परस्परसंबंधात देखील हि बाब अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा पार्थ (अर्जुन) ज्ञानी रूपात दिसतो तेव्हा इंद्रियांचेस्वामी असलेले वासुदेव सारथीची भूमिका अगदी हसत खेळत पार पडताना दिसतात व अत्यंत शांतपणे केवळ काय चाललंय ते बघतात. यातून योग्य वेळी शांत राहून केवळ बघण्याचे महत्व आपणास कळते.
हे शब्द आणि यांचे अधिक सविस्तर महत्व आपण येत्या भागात पाहणार आहोतच.
पुढील भागात आपण "अर्जुन द्वारा सैन्य निरीक्षण" हा प्रसंग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
।। जय श्रीकृष्ण ।।

केवळ सुंदर 🌼
उत्तर द्याहटवा