49) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- ध्येय प्राप्तीमध्ये येऊ शकणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करायच्या पद्धती



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

49) ध्येय प्राप्तीमध्ये येऊ शकणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करायच्या पद्धती


अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ १२-९ ॥

आता या भागात भगवंत ध्येय प्राप्तीमध्ये येऊ शकणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करायच्या पद्धतीची माहिती देतात. पहिला मुद्दा भगवंत सांगतात, जर तू ( भक्त ) भगवंतामध्ये ( धेय्यावर ) मन केंद्रित करायला समर्थ नसशील, तर हे धनंजया ( वाचकरुपी अर्जुन ) तू अभयासाने हे साध्य कर. अभ्यासाने म्हणजेच सरावाने मला प्राप्त करण्याची इच्छा मनात उत्पन्न कर.

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १२-१० ॥

वरील पद्धत हि जमत नसेल तर काय करावे याविषयी भगवंत सांगतात, भगवंत म्हणतात, जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरीता कर्म कर,  अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही तुला माझी ( धेय्याची ) प्राप्ती होईल. इथे भगवंत सांगतात कि मन केंद्रित होत नाही किंवा त्याचा सरावही जमत नसेल तर केवळ ध्येय्यासाठी कर्म कर म्हणजेच तुझी प्रत्येक शारीरिक कृती ध्येय्यासाठी असेल. यापद्धतीने हळू हळू मनाला गोडी लागेल आणि धेय्यकडे वाटचाल सोपी होईल. 

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः । 
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ १२-११ ॥

जर वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर सर्व कर्मफलांचा त्याग करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचं प्रयत्न कर. कर्मफलसन्यास माणसाला अपराधी भाव आणि अपेक्षांचे ओझे या दोन्हींमधून मुक्त होऊन चित्त स्थिर करण्यात मदत करतो. 

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते । ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥ १२-१२ ॥


भगवंत आणखी एक उपाय सांगतात, भगवंत म्हणतात कि जर वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तू ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न कर. अभ्यासाने ज्ञान मिळते आणि ज्ञान माणसाला विचार आणि कृती दोन्हीसाठी पात्रता प्रदान करते. यात सुद्धा,  अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा  ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. परमशांती म्हणजे मनुष्य धेय्यप्राप्तीच्या मार्गावर अतिशय मनमोकळेपणे कुठलाही तणाव न घेता कार्य करू शकतो.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 48) अध्याय 12 भक्तियोग प्रारंभ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ